आपला हितकर्ता पक्ष कोणता ?


? सावधान ! सावधान ! सावधान : आपला हितकर्ता पक्ष कोणता ??

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात?

आपला हितकर्ता कोण हे निवडतांना या पुढे फार सावधगिरी बाळगा. तुम्हाला सुद्धा बुद्धी प्राप्त झाली आहे. त्या बुद्धीच्या बळावर तुम्ही सारासार विचारसरणीने तुमचे खरे हितकर्ते कोण? कोणता पक्ष तुमच्या साठी प्राणाची पर्वा न करता झगडण्यास समर्थ आहे, याची तुम्हीच निवड करा.
खरे पाहिले असता जगात फक्त दोनच जाती आहेत. पहिली श्रीमंतांची व दुसरी गरिबांची. या शिवाय तिसरा वर्ग म्हटला म्हणजे मध्यम वर्ग होय. जगात  कोणत्याही उज्ज्वल चळवळीच्या नाशास हाच वर्ग कारणीभूत होत असतो. आपण कल्पना करा की आपल्या देशात कष्टाने आपले पोट भरणारे आपले बांधव शेकडा ८० आहेत. या संख्येच्या मानाने इतर वर्ग किती अल्प आहेत याची कल्पना करा. परंतु केवळ अज्ञानामुळे आणि वरिष्ठ म्हणणाऱ्यांच्या हाती सत्ता असल्यामुळे आपणासारख्या बहुसंख्यांक जनतेला ते शह देऊ शकतात. परंतु आपण सर्व लोक जागरूक झालात, तुम्हाला तुमचे हित कश्यात आहे हे संघशक्तीने आणि स्वावलंबनाने कळावयास लागले तर आपण एका चुटकी सरशी सर्व अधिकार आपल्या हाती घेऊ शकाल.
(संदर्भ Vol. 18/2)
?जयभीम?

—-संग्राहक—-
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org
(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)

प्रतिक्रिया : ?
वरील बाबासाहेबांच्या भाषणातील उताऱ्यात, ” केवळ अज्ञानामुळे आणि वरिष्ठ म्हणणाऱ्यांच्या हाती सत्ता असल्यामुळे आपणासारख्या बहुसंख्यांक जनतेला ते शह देऊ शकतात” असे वाक्य आढळते..बाबासाहेबांनी उच्चारलेला हा शब्द म्हणजे काही SC/ST/OBC या ८५ टक्के लोकांचे गणित मांडणारे बहुजनवादी जे स्वउत्थानासाठी बौद्ध धम्माचा स्वीकारही न करता बुद्धाचा बहुजन शब्द म्हणून जी शुद्ध फसवेगिरी करतात तसा अर्थबोध वा त्या अर्थाने बाबासाहेबांनी उच्चारलेला तो शब्द नसून कष्टकरी गरीब जनता जी ८० टक्के आहे त्यांना बहुसंख्यांक जनता असे बाबासाहेबांनी संबोधले आहे. हे सुज्ञ आंबेडकरी बौद्ध जनतेने लक्षात घेऊन सर्व भारतीयांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी स्थापित करून दिलेल्या रिपब्लिकन पार्टी च्या तत्त्वज्ञानाचीच कास धरावी ज्यात शोषण व पिळवणूक होणाऱ्या कष्टकऱ्या बहुसंख्यांक कामगारांचे प्रश्न अग्रक्रमाने मांडून आम्हा सर्वांचा उद्धार करण्याची ताकत रिपब्लिकन तत्वज्ञानात मांडली आहे. हे विसरता कामा नये.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.