निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा


? ‘निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा’?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात??

आपणास स्वाभिमानाची अत्यन्त जरूरी आहे. स्वाभिमान सोडून साधलेली उन्नती हि कुचकामाची आहे. इतरांप्रमाणे आपणही माणसेच आहोत हि गोष्ट प्रत्येक तरुणाने आपल्या मनात वागविली पाहिजे.
हजारो वर्षे चालू असलेल्या जुलूम जबरदस्तीने आपल्या समाजाच्या भावना मारल्या गेल्या आहेत. ब्राह्मणी राज्यात आपण स्वाभिमानाने वागलो तर ‘पाह्यरी सोडल्याचा’ आरोप ठेवून आपणास हत्तीच्या पायीही देण्यात आले असते .
आपण उन्नतीचा मार्ग आखला पाहिजे. अशिव व अमंगल अश्या आपणातील चाली आपण सोडून दिल्या पाहिजेत. ‘पडे खावयाचे व तुकडे मोडावयाचे’ दिवस आता उरले नाहीत. आपल्या लोकांना इतर लोकांप्रमाणेच समाजातील अधिकाराच्या जागा मिळाल्या पाहिजेत.
आपण लोकांनी आपल्या अंगी निर्भयता बाणविली पाहिजे. आपल्या समाजास मानसन्मानाने जगात राहावयाचे असल्यास आपण सदैव मरावयास तयार असले पाहिजे. अशी आपली वृत्ती झाली की आपला अपमान करण्यास कोणीही धजणार नाही. ‘निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा’
(संदर्भ Vol 18/2)
??जयभीम??
—–संग्राहक—–
उज्वला इंगोले
समता सैनिक दल ,यवतमाळ
www.ssdindia.org
(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या  पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

टीप: बाबासाहेबांनी स्थापित केलेल्या रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या पाचव्या क्रमांकाच्या तत्ववप्रणाली मध्ये नमूद केल्याप्रमाणे भयमुक्ती (निर्भयता) हे तत्व समाजात रुजविण्यासाठी आम्ही अविरत संघर्षरत असलो पाहिजे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.