आपली झोपडी (आजघडीला RPI) जिवंत ठेवा.


? आपली झोपडी (आजघडीला RPI) जिवंत ठेवा.?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या निष्ठावंत अनुयायांना निर्वाणीचा संदेश ??

प्रत्येक माणसाने फेडरेशन (SCF) मध्ये गटबाजी सुरू केली आहे. प्रत्येकाने आपापले लहान लहान गट निर्माण केले आहे. एकाचे वर्चस्व दुसऱ्यास नको आहे. यामुळे आपले लोक अजूनतरी राजकारणात पक्के मुरले नाहीत. राजकारण म्हणजे काय ह्याची त्यास पूर्णपणे जाणीव नाही. आपल्या समाजात आपापसात फार मतभेद असतात. ते मतभेद लवकर नष्ट होत नाहीत. त्या मतभेदाची झाडे त्यांच्या पोटात वाढू लागतात. त्यांचे मतभेद त्यांच्या मुलांच्याही पोटात वाढतात. अशारीतीने मतभेद वाढत जातात. हा गुणधर्म आपल्या लोकांत जास्त प्रमाणात आहे. इतर पक्षात सुद्धा मतभेद आहेत. त्याबरोबरच त्यांच्या जवळ काही सद्गुणही आहेत. असे अनुभवाने म्हणावे लागते. त्यांचा एक गुण फार महत्वाचा आणि तो म्हणजे बहुमताने ठरलेले ते सर्व मान्य करतात. मग त्या गोष्टीचे विरोधक सुद्धा खोट्याचे समर्थन करू लागतात. ही कृती राजकारणात फार आवश्यक आहे. माझ्या मताप्रमाणे जर कारभार चालला तरच मी संस्थेत राहीन अशी प्रवृत्ती फार वाईट. हम करे सो कायदा नको.
बाकीच्यांची घरे मोडली तरी आपली झोपडी तशीच ठेवा. लोक तुमच्याच आश्रयाला येतील. तुमची झोपडी जिवंत राहीली तरच तुमचा जय आहे. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा किल्ला (Predecessor of RPI) हा अस्पृश्य जनतेच्या भावनेवर उभारला आहे. तो मोडू देता कामा नये. राजकारणात भांडणे होतात ती विसरून जाण्याची सवय ठेवली पाहिजे.
( संदर्भ vol 18/3 )
?जय भीम?
—–संग्राहक—-
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.