प्राचीन प्रबुद्ध भारतातील रिपब्लिकन संस्कृतीत असणारी गुप्त मतदान यंत्रणा


? प्राचीन प्रबुद्ध भारतातील रिपब्लिकन संस्कृतीत असणारी गुप्त मतदान यंत्रणा?

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात??

बहुतेक सर्वांचा समज असा आहे की गुप्त मतदान पद्धती आपण इंग्रजापासून उचलली. अर्थात हाही गैरसमज आहे. ‘विनय पिटिकेत’ (Buddhist literature) गुप्त मतदानाची विशिष्ट व्यवस्था असे. त्यांना ‘सालपत्रकगृहे’ असे म्हणत. झाडाच्या सालीचा मतपत्रिका म्हणून उपयोग करीत. काही कारणामुळे आम्ही आपली राजकीय दृष्टी गमावली हि गोष्ट मी मान्य करतो.
समाजातील दोषाचे निर्मूलन करणे हाच कायदा करण्याचा हेतू असतो. दुर्दैवाने प्राचीन समाजांनी समाजातील दोष काढून टाकण्यासाठी कायद्याचा उपयोग केला नाही. त्यामुळे त्यांचा नाश झाला. या देशात जितक्या क्रांत्या झालेल्या आहेत तितक्या पृथ्वीतलावरील कोणत्याही राष्ट्रात झालेल्या नाहीत. पोपचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी युरोपात जेव्हा झगडे झाले त्याच्या आधी कित्येक वर्षे हिंदुस्थानात धर्माधिष्ठित विरुद्ध धर्मनिरपेक्ष कायदा असा झगडा चालू होता. दुर्दैवाने हिंदुस्थानात धार्मिक कायदा श्रेष्ठ ठरला. माझ्या मते देशावर ती एक फार मोठी आपत्ती ओढवली. कायद्यात बदल करता येत नाही असा समज हिंदू समाजातील प्रतिगामी लोकांमध्ये त्या काळी रूढ होता हेच हि आपत्ती ओढवण्याचे कारण आहे.
(संदर्भ Vol.18/3)
?जयभीम?
—-संग्राहक—–
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org
( संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.