आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये (Successor of SCF >>>RPI) जमलो पाहिजे


? आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये (Successor of SCF >>>RPI) जमलो पाहिजे.?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निष्ठावंत कार्यकर्त्यांना आदेश..
?
आपले उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील कि , ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोड्याश्या नोकऱ्यासाठी किंवा सवलतीसाठी आपला लढा नाही. आमच्या अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय. ती कृतीत उतरविण्यासाठी केवढे भगीरथ प्रयत्न करावे लागतील ते मग तुमच्या ध्यानात येईल. केवळ निवेदांचा किंवा शब्दाचा काही उपयोग होणार नाही.
इतर कोणाच्याही सदिच्छेवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. आपण स्वतःवरच विश्वास ठेवला पाहोजे. आपण आपली संघटना जोरदार केली पाहिजे. आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये जमलो पाहिजे व जगाला दाखवून दिले पाहिजे की अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनमध्ये (Predecessor of RPI) अखिल अस्पृश्य समाजाची एकजूट झाली आहे.
(संदर्भ Vol 18 /2)
? जयभीम?
—-संग्राहक—-
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org

(संविधानिक रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.