आपली संघटना मजबूत करा


? आपली संघटना मजबूत करा?????

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात–

जो पर्यंत तुम्ही तुमच्या मजबूत संघटनेच्या बळावर आपली ताकत इतर जगाला-समाजाला दाखविणार नाही तो पर्यंत तुमच्यावर हे असले जाच नेहमी चालुच राहणार. या जुलुमाबाबत तुम्हाला वेदातील एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. एकदा देवाकडे मेंढराने आपली फिर्याद केली की ” देवा तू बा सर्व पृथ्वी निर्माण केलीस, पशु-पक्षी, झाडे-झुडपे, मनुष्यप्राणी इत्यादी अवघे चराचर तू निर्माण केलेस. म्हणून तू आमचा पिता व आम्ही तुझी लेकरे. पर्यायाने आम्ही सर्व भावंडे झालो. तूच निर्माण केलेल्या वाघ-सिहानी  डोळ्यादेखत आम्हा मेंढराला अगदी सहज, कसलीही पर्वा व चाड न ठेवता गट्टगिळ करावे काय? देवाने उत्तर दिले : ” हे बघ. तू म्हणतोस तशी  वस्तुस्थिती आहे खरी. पण त्याचबरोबर हेही खरे आहे की तुझं बाह्य स्वरूपच इतकं ,नेभळट दिसते की जरी मी तुझा निर्माता असलो तरीसुद्धा या वेळी तुझी हि दुबळी चर्या पाहून तुला खाऊन टाकावे, असे मला वाटते आहे. तर तुझी हि सदोदित खाली असलेली मान जरा ताठ करून ऐटीत राहा. तरतरीत दिसण्याचा प्रयत्न कर, रुबाबदार राहा, चाल करून आलेल्याचा प्रतिकार  करण्याचा न्यायबुद्धी प्रयत्न कर. दुसऱ्यावर विसम्बु नकोस, ठोशास ठोसा या न्यायाने वाग. मग पाहू बरे: कोण तुला त्रास देतो? कोण तुला खातो? ” या कथे प्रमाणे तुम्ही आपली  परावलंबी वृत्ती टाकून  एकजुटीने अत्यन्त प्रभावी अशा संघटनेने राहा.
( संदर्भ vol 18/3)

टीप: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघटनांच्या संविधानासकट जन्मास घालून दिलेल्या संघटना म्हणजे समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी आणि भारतीय बौद्ध महासभा होत.
??जय भीम??

——संग्राहक——
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ

दलामध्ये सदस्य बनण्यासाठी संपर्क साधावा!
?8655582188 अरिंय बौद्ध
?9324127909 बोध गणसिंह

वेबसाईट लॉगिंन करून रजिस्टेशन करावेत! www.ssdindia.org

( संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बाधणी साठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.