One man One vote, One vote One Value


?एक व्यक्ती : एक मत,
एक मत : एक मूल्य
( One man One vote,
One vote One Value )?

डॉ.बाबासाहेब म्हणतात—

” कायदेमंडळावर योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी आपणास मताचा अधिकार आहे हा अधिकार फार महत्त्वाचा व मोठा आहे. तेव्हा आपल्या मताची बहुमोल शक्ती भलत्याच ठिकाणी वाया जाता कामा नये. सध्या आपल्या देशात सधन लोक मते विकत घेतात, पण मत हि विकण्याची वस्तू नाही. ती आपली संरक्षणाची साधनशक्ती आहे. मत विकणे हा गुन्हा तर आहेच, पण तो आत्मघातकीपणा देखील आहे. मते विकून लायक नसलेल्या उमेदवारांची खोगीरभरती कायदेमंडळावर  केल्याने देशाचे अपरिमित नुकसान होऊन राष्ट्र अधोगतीस जाते. स्वता: नालायक व अपात्र असून पैशाच्या जोरावर विधिमंडळात जाऊ इच्छिणारे काही लोक तुम्हाला द्रव्याचे अमिष दाखवतील. अशा कोणत्याही मोहास तुम्ही बळी पडू नका. मोहास बळी पडलात तर तुम्ही आपल्या पायावर पर्यायाने समाजाच्या पायावर धोंडा मारून घ्याल हि धोक्याची सूचना मी आज सर्वांना देत आहे. मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो, म्हणून  तर तो द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो. अशा उमेद्वाराकडून समाजहिताची व राष्ट्र हिताची कार्ये होत नाहीत. पैसेवाला जर कायदेमंडळात गेला तर तो पैसेवाल्या लोकांचे हितसंरक्षण करील व तो सर्वसामान्य व गरिबांच्या हिताच्या आड येईल. म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करू नका व आपली दिशाभूल करून घेऊ नका !!”

विचार संदर्भ – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर  लेखन आणि भाषणे, खंड 18 (1) पान नंबर 466)

—जनहितार्थ जारी—

द्वारा: समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी नागपूर
www.ssdindia.org
(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.