बाबासाहेबांचा विद्यार्थ्याना राजकीय संदेश


?बाबासाहेबांचा विद्यार्थ्याना राजकीय संदेश?

” आतापर्यंत जरी आपल्यातील बहुसंख्य विद्यार्थीवर्ग राजकीय लक्ष घालीत असलेला दिसला तरी त्याला राजकारण म्हणजे काय, त्यासाठी कोणत्या जबाबदार्‍या घ्याव्या लागतात आणी राजकीय घडामोडी यशस्वि करण्यासाठी कोणते मार्ग चोखाळावे लागतात याची निश्चीत जाणीव नव्हती. विश्वविद्यालयीन जीवनाची आणी आयुष्यातील खर्‍याखुर्‍या प्रश्नाची व राजकारणाची मी वर म्हटल्याप्रमाणे फारकत होती आणि जेव्हा मी, आपण एका नविन दालणात प्रवेश केला आहे असे म्हणता त्यावेळीच तुम्ही माझ्या सुचनेनुसार ह्या काॅलेजातील विद्यार्थ्यांचे पार्लमेंट स्थापन केले असुन तुम्हाला त्याद्वारे पुढील गोष्टी करावयाच्या आहेत हा अर्थ माझ्या मनात अभिप्रेत असतो.

1) तुमच्या मनाचा विकास करने, तुमचे ध्येय विस्तृत करने, तुमची विचार करण्याची पात्रता वाढवणे व कठीण प्रश्नांचा उलगडा करण्याची तुमची ताकद वाढवणे.

2) अशी ही तुम्हाला लाभलेली तुमची शक्ती, पात्रता, तुमचे ध्येय, तुमची ताकद याचा उपयोग ह्या देशातील अफाट जनतेला आज जे प्रश्न भेडसावित आहेत त्यातुन मार्ग काढण्यासाठी खर्च करणे.

आणि ही गोष्ट काही सोपी नाही, निवांत अभ्यासिकेत किंवा रसायन अथवा पदार्थ विज्ञान शास्त्राच्या प्रयोग शाळेत बसुन असले कठीण प्रश्न सुटत नसतात व हे काम तितकेसे सोपे नाही. त्यासाठी याहुनही काही अधिक केले पाहीजे. तुम्ही केवळ राज्यशास्त्र, इतिहास, व्यापार, आयात-निर्यात, चलन आणी जे जे विषय आपल्या लोकांच्या जीवनात महत्वाचे आहेत त्याचा अभ्यास करणार आहात असे नसुन प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही स्वतःलाच नव्हे तर या देशाची राज्यधुरा जे राजकारणी पुरुष वाहतात त्यांनाही देशातील कठीण प्रश्न सोडविण्यास मदत करणार आहात आणी त्यांचे कुठे चुकते तेही दाखवुन देणार आहात आणि एवढ्याचसाठी मी असे म्हणतो की निदान ह्या काॅलेजातील विद्यार्थी, आणी मी अशी आशा करतो की संबंध हिंदुस्थानमधील जरी नाहीत तरी ह्या इलाख्यातील इतर काॅलेजातील विद्यार्थीही आज एका नविन दालनात प्रवेश करीत आहेत.

तुम्ही हे ‘ पार्लमेंट ‘ म्हणजे केवळ एक करमणुक आहे असे समजणार नाही असे मला वाटते. काही तरुणांच्या अतीउत्साहाला योग्य स्थळ मिळणे अशक्य होते म्हणुनच या ठीकाणी येउन तो अती उत्साह टिंगल करण्यात कींवा थट्टा मस्करीत आणी हसण्यात घालविण्याचे हे स्थळ आहे असे समजु नये. उलट, त्याच्या इतमामाला साजेशा गंभीरपणाने तुम्ही त्यात भाग घ्याल अशी मला आशा आहे आणि ह्या सभागृहातील सरकारचे सभासद व विरुध्द पक्षातील नेते केवळ दोन बाजुकडील नेतेच नव्हे तर सर्वच सभासद या सभागृहात येउन उपस्थित प्रश्नावर आपल्या मगदुराप्रमाणे अभ्यासपुर्ण चर्चा करतील अशीही मला आशा आहे. ”

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
DBAWAS VOL 18 III Page no 76 & 77

संकलन- सी पी उराडे
समता सैनिक दल, HQ दिक्षाभुमी नागपुर www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.