राजकारणी व्यक्ती कसा असावा ?


? राजकारणी व्यक्ती कसा असावा??

डॉ.बाबासाहेब म्हणतात, ” माझ्या वयाची 60 वर्ष पूर्ण केली आहेत. मी जर सरकारी नोकरीत असतो तर सेवानिवृत्त होण्याची सक्ती माझ्या वर करण्यात आली असती. पण हा नियम राजकारणी लोकांना लागू होत नाही. तसे असते तर बरे झाले असते. आजकाल असे दिसून येते की ज्यांना उदरनिर्वाहाची साधने नाहीत व बुद्धिमत्ता नाही असे 55 वर्षे वयावरील लोक राजकारणी बनून आपला उदरनिर्वाह चालवीत आहेत.
बाबासाहेब राजकारणात उतरून 30 वर्षाचा वर काळ लोटला आहे. इतक्या लांब काळा पर्यंत राजकारणात सतत वावरत असलेला एक हि माणूस सध्या भारतात नाही. फावल्या वेळी राजकारण करणे हा सामान्य नियम आहे. या 30 वर्षापैकी आठ वर्षे बाबासाहेबांनी केंद्रीय सरकारचा सभासद म्हणून घालविली आहेत. या क्षेत्रात सुद्धा कोणीही बाबासाहेबांच्या पुढे गेलेला नाही. बाबासाहेबांची इच्छा असती तर आणखी काही काळ सरकारचा सभासद म्हणून राहू शकले असते.
बाबासाहेब म्हणतात, “परंतु जेव्हा पासून मला जीवनाचा अर्थ समजू लागला तेव्हा पासून म्हणजे माझ्या लहान पणापासूनच मी सतत एका तत्वांचे अनुसरण केले. ते तत्व म्हणजे माझ्या अस्पृश्य बांधवांची सेवा करणे होय. मी कोठे हि असो किंवा कोणत्याही पदावर असो परंतु नेहमीच माझ्या बांधवांच्या भल्याकरिता मी चिंतन करीत असतो व कार्य करीत असतो. दुसऱ्या कोणत्याही प्रश्नाला मी कधीही इतके महत्व दिलेले नाही. अस्पृश्याच्या हिताचे संरक्षण मी केलेच पाहिजे हेच माझ्या भूतकाळातील जीवनाचे ध्येय होते आणि भविष्यात हि हेच माझं ध्येय राहील. किफायतशीर अशा भल्या मोठ्या पगाराच्या अनेक नोकऱ्या मला देऊ करण्यात आल्या होत्या परंतु माझ्या लोकांची सेवा करणे हे माझ्या जीवनाचे ध्येय असल्यामुळे त्या नोकऱ्या मी नाकारल्या.
परदेशातून अर्थशास्त्राची उच्च पदवी धारण करून येणारा केवळ अस्पृश्यतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून बाबासाहेब पहिले व्यक्ती होते. मुंबईत उतरल्यावर ताबडतोब मुंबई सरकारने राजनैतिक अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची जागा देऊ केली. परंतु ती नोकरी  बाबासाहेबांनी नाकारली कारण त्यांना माहित होते की एखादी सरकारी नोकरी पत्करल्यावर स्वभावतःच आपल्या लोकांची सेवा करण्याच्या इच्छेवर बंधने येऊन पडतात. आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या कोणावरही जो अवलंबून नसतो तोच माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो.
1947 साली केंद्रीय सरकारात सामील झाले. बाबासाहेब काँग्रेस ला मिळाले अशी टीका काही टीकाकारांनी केली. टिकाकारांनी केलेल्या टिकेला बाबासाहेबानी लखनौच्या भाषणात ऊत्तर दिले. ते असे “पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणाऱ्या मातीच्या ढेकळप्रमाणे मी भुसभुशीत नसुन मी पाण्यात न विरघळता नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या एखाद्या भक्कम खडकासारखा आहे. मी कोठे हि असलो  किंवा कोणाच्याहि संगतीत मी राहिलो तरी माझे स्वतःचे वैशिष्ट्य मी कधीही गामावणार नाही, जे लोक आपल्या शब्दाशी व कर्तृत्वाशी प्रामाणिक राहून अस्पृश्याच्या कार्यात मदत करू इच्छितात त्यांच्याशी मी आनंदाने सहकार्य करून त्यांना मदत करिन. जे केवळ गोडबोले व गोड थापा मारणारे आहेत परंतू ज्याचा अंतस्थ हेतू आणि कृती आमच्या लोकांच्या हिताच्या विरोधी असते  त्यांना मी कदापिहि  मदत करणार नाही”.
(संदर्भ Vol 18/3)

?? जय भीम??

—संग्राहक—-
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org

(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या  पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.