बाबासाहेबांचा राजकारणात प्रवेश : साल 1919 पासून


बाबासाहेबांचा राजकारणात प्रवेश : साल 1919 पासून

1919 सालापासून म्हणजे गांधींनी पाय टाकला तेव्हा पासून मी राजकारणात आहे. तरीही त्यांच नि माझं जुळलं नाही. अनेक प्रकारच्या खटपटी आम्ही केल्या .महाडच्या पाण्याचा सत्याग्रह, नाशिकच्या मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, नाना प्रकारचे सत्याग्रह केलेत. परंतु कोणी सहानुभूती दाखवली नाही. वर्तमानपत्रातून आमची व्यंगचित्रे येत.बातमीदार येत नसत. मी बहिस्कृत भारताचा संपादक होतो.1919 पासून 1942 पर्यंत मी संपादक होतो.एकदा केसरीला जाहिरात पाठवली. त्याच बरोबर जाहिरातीचे बिल रु.3 ची मनीऑर्डर  केली पण परत आली. कारण जागा नाही म्हणून.टाइम्स ऑफ इंडिया ला टेलिफोन केला त्यांना वाटले कुठली हि भिकारडी त्रास द्यायला लागली. त्याचेही उत्तर नाही आणिआता सारखे पाठीमागे लागतात रिपोर्ट द्या म्हणून. हि अशी परिस्तिथी. इतक्या थराला आमची चळवळ गेली.
मी खरोखर महार लोकांचा ऋणी आहे. महार लोकांच्या बळावर मी हे करू शकलो. हा माझा 30 वर्षांचा अनुभव आहे. महार रणशुर आहेत, लढू शकतात, त्याग करू शकतात. इतर कोणतीही जात हे करू शकत नाही. तेव्हा माझ्यादृष्टीने त्यांचे माझ्यावर अनेक उपकार झाले आहेत. मी येथे जातीवाचक उच्चार करतो त्याबद्दल कोणी आरोप कारील. पण मी या जातीत जन्मलो या बद्दल मला मोठा अभिमान आहे.या स्थितीला अस्पृश्य समाज आला त्याचे बरेचसे श्रेय तुम्हा पुरुषांना आहे. त्यात स्त्रियांचाही मोठा  भाग आहे.
30 वर्षांपूर्वीच्या स्त्रिया फार वेडगळ आणि गलिच्छ राहत. मला त्यावेळी स्त्रिया “बामण” आहे असं म्हणत’ आम्हाला नाही बामण व्हायचं’ -अश्या म्हणत.आजची स्थिती तशी नाही. परुंतु अजून आपण शिखरावर पोहचलो नाही. मध्यावर आलो आहोत. कठडा चढत आहोत.कधी पाय घसरेल सांगता येत नाही. अजूनही संकटस्थिती मानली पाहिजे. मी पुढारी का तो पुढारी हे भांडण आता मिटविले पाहिजे. सार्वजनिक कार्याला मदत करा. हजारो प्रकारच्या संस्था दानधर्म करून जातीचा उद्गार करतात. कोकन्स्थब्राम्हण , देशस्थ ब्राम्हण,सारस्वत ब्राम्हण,प्रभू इ. ब्राम्हणाच्या संस्था आहेत. त्यांनी आपल्या जातीच्या विध्यर्थ्यांना विलायतेला पाठविले आहे. मोठ्या हुद्द्याच्या जागा मिळवून दिल्या आहेत.त्या गोष्टी ध्यानात घेऊन महिन्याला 1 रुपया द्यायचं ठरविलं तर वर्षाकाठी किती तरी कार्य होईल. माझी आता म्हंटली तरी आठ दहा वर्षच राहिली आहेत.”बाबासाहेब आहेत म्हणून आम्ही काहीच करायचं नाही असं म्हणून भागणार नाही” मी आता राजकारणा पासून अलिप्त होणार आहे. तुमचं जीवन तुम्हीच उज्ज्वल करायचं आहे. त्याग, चिकाटी  निस्वार्थीपणा, बल एकवटून कार्य करा.मला माझ्या हयातीत तुम्ही आपलं काय करता ते पाहू द्या. मेल्यावर तुम्ही भलं केलं की वाईट केलं हे मला कळणार कसं?  हे माझं तुम्हाला  निक्षून सांगणं आहे.
(संदर्भ-Vol 18/3)
??जयभिम??

—संग्राहक—

उज्वला इंगोले
समता सैनिक दल
यवतमाळ
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.