आपले संघटन कोणते ? 1


आपले संघटन कोणते ?

संकलन : अजय माळवे, मुंबई

आजची परीस्थिती बघता सर्वच डाॅ. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेणारे पुढारी, कार्यकर्ता व समाज हे मोठे छातीठोकपणे मिरवत आहे की आम्हीच काय ते बाबासाहेबांची चळवळ पुढे नेत आहोत, त्यांच्याच विचाराने आम्ही चाललो आहोत याचा विचार करणे खुप आवश्यक आहे.
मग आपण समाजापासून सुरवात करू या,
बाबासाहेब म्हणतात एक मुलगा बी.ए. झाल्याने आपल्या अस्पृश्य समाजास तो जसा आधार होईल तसा एक हजार मुले चौथी पास झाली तरी होणार नाही. प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करावे असे मी म्हणत नाही. मी जे म्हणतो ते हे की हल्लीची आपली परीस्थिती अशी चमत्कारीक आहे की वरच्या प्रतीचे शिक्षण घेत असलेल्या मुलाला जितक्या लवकर शिखरास नेवून पोहचवू तितके बरे. याचाच अर्थ बाबासाहेबांनी समाजावर किती मोठी जबाबदारी सोपविली आहे. जे घोषवाक्य शिकवा,चेतवा, संघटित करा त्यातील शिकवा ही जबाबदारी समाजाने किती टक्के पूर्ण केली याचे आत्मपरीक्षण समाजातील प्रत्येक व्यक्तीने करावे उत्तर नक्की मिळेल.
बाबासाहेब दोन प्रकारचे धंदे करण्यास सांगतात. एक पांढरपेशा व दुसरा शेती, पांढरपेशा अवलंब का करावा याचे कारण बाबासाहेब सांगतात की सरकार ही एक मोठी जबरदस्त महत्त्वाची संस्था आहे. सरकार ज्याप्रमाणे मनात आणील त्याप्रमाणे सर्व काही घडून येईल. पण आपण हे विसरता कामा नये की, सरकार कोणत्या गोष्टी घडवुन आणील हे सरकारी नोकरांवर सर्वस्वी अवलंबून राहील.
आता सांगा किती समाज या क्षेत्रात आहे ?
सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनो आपले सामाजिक संघटन कोणते? मोठे प्रश्न चिन्ह आहे ? बाबासाहेबांनी सामाजिक संघटन म्हणून “समता सैनिक दल ” हे दिले आहे व गाव तिथे शाखा घर तिथे सैनिक असावयास हवे. मग या शिवाय दुसरे कोणतेही सामाजिक संघटन दिले नाही , मग समाजाने किती शाखा स्थापन केल्यात? किती समाजाने तिचे सभासदत्व स्विकारले आहे? उलट समाजातील विद्वान वर्गाने वेगवेगळे संघटन स्थापून दिशाभूल केलेली दिसत आहे,  याचे सर्व श्रेय नेमके कोणाला द्यायचे?
बाबासाहेब सांगतात आपले धार्मिक संघटन “दि बुद्धीष्ट सोसायटी आॅफ इंडीया ” होय.
काय आपण त्याचे रितसर सभासद आहोत का ?
आणि राजकीय श्रेत्रात समता स्वात्रंत्र्य, बंधुभाव या विचाराने शासनकर्ती जमात होण्यासाठी आपल्याला एकमेव राजकीय पक्ष रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडीया हा आणी हाच दिलेला आहे, ह्या पक्षाला सात तत्वे  (Seven great Principles) दिलेली आहे. काय या तत्वाप्रमाणे पक्ष कार्यरत राहून त्यांना समाजात रुजवीत आहे? समाजाने याची कधी चिकित्सा केली आहे काय?
जर आपण बाबासाहेबांनी दिलेल्या तिन्ही संघटना सोडून इतर संघटने मध्ये काम करत असू तर मग आपण त्यांचे खरे अनुयायी किंवा त्यांची लेकरे आहोत काय ?
आपल्या बापाने दिलेल्या आपल्या मातृसंघटना सोडून दुसयाला बाप करून त्यांच्या संघटना चालवत असू तर हे काय योग्य आहे का?

अजय माळवे
समता सैनिक दल
www.ssdindia.org


Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.

One thought on “आपले संघटन कोणते ?