चौथी संघटना ? बेशिस्तपनाचे लक्षण


Questions by Mr. Akshay

प्रशिक सर,
१.The Republicans मुळे रिपब्लिकन कन्सेप्टचा  जाहीर प्रचार होत असेल तर विरोध कशाकरिता?
२.पक्षबांधणी करण्यापूर्वी एखाद्या संघटनेच्या माध्यमातून जागृती करणे फलदायी साबित होऊ शकत नाही काय?
३.मी The Republicans चा समर्थकही नाही,पण त्यांच्यांशी भांडण करुन आपण आपल्याच  समविचारी मित्रांपासून अलग तर नाही ना पडत?
४.रिपब्लिकन चळवळीची पुनर्बांधणी करण्यासाठी योग्य उपाय कोणता?
५.हर्षवर्धनजी ढोके सर व तुमच्यात असलेले मतभेद समाजाच्या हितासाठी व रिपब्लिकन जनतेसाठी तरी लवकरात लवकर संपुष्टात आणणे जरुरी नाही काय?त्यासाठी आपण मैत्रीपूर्ण एकमेकांविषयी कसलीही द्वेषभावना न ठेवता चर्चा करायला हवी,असे आम्हांला वाटणे चुकीचे आहे काय?

जय रिपब्लिकन..
[22/05/17, 6:23 p.m.] Prashik aanand: जय भीम सर,
1.रिपब्लिकन तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार ज्यांना-ज्यांना ज्या कुठल्या प्रकारे, पद्धतीने करावासा वाटतो त्यांनी तो निश्चितच करावयास हवा. त्यासाठी मी व्यक्तिगत रूपाने त्यांचा विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे मी याद्वारे स्पष्ट करू इच्छितो.
2. जागृतीचा मशाल सतत तेवत ठेवा असे खुद्द बाबासाहेबांचेच सांगणे आहे. तेव्हा जसे एखाद्याला एखाद्या संघटनेद्वारे (उदा. The Republican) ते कार्य करावेसे वाटते व त्याला त्याचे स्वातंत्र्य आहे असे त्यांचे मत आहे, तसेच ते स्वातंत्र्य इतरांनाही आहे हे समजून घेऊन, त्याची जाणीव ठेवून जर बाबासाहेबांच्या अनुयायांद्वारे जर का रिपब्लिकन तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार, बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या संघटनांद्वारे (उदा.SSD, BSI) कोणी करीत असतील तर त्यांच्यावर ताशेरे ओढून आपल्या शहाणपणाचे व श्रेष्ठत्वाचे प्रदर्शन करून आम्ही करतो आहेत तेच योग्य आहे असे मात्र इतरांपुढे कोणी भासवत असतील तर त्यास आपण योग्य म्हणणार काय??
3. माझे व्यक्तिगत कुणाशीच भांडण नाही. माझे भांडण वैचारिक स्वरूपाचे आहे. चळवळीसंबंधात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जर समविचारी वाटणाऱ्या मित्रांकडून सोडवणूक करण्यासंबंधी सहकार्य मिळत नसेल वा त्यांची काही मदत होण्याची शक्यता दिसत नसेल तर त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण पुढील वाटचाल करावयास स्वतंत्र असावयास नको का??
4. रिपब्लिकन चळवळीची पुनर्बांधणी करण्याविषयक मी मागील वर्षी एक लेख लिहिला आहे. रिपब्लिकन पार्टीची पुनर्बांधणी आणि ती सोडविण्याचे उपाय. यांत कदाचित आपल्या या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास आपल्याला त्याद्वारे काही मदत होऊ शकते का ते तपासावे. नसल्यास कोणत्या उपाययोजना करता येईल ते सुचवावे. मी चर्चेस तयार आहे.
5. आयु. हर्षवर्धन ढोके सर यांच्यासमवेत मी आणि आमचे काही निवडक वैचारिक सहकारी मित्रमंडळी यांनी त्यांच्याशी वेळोवेळी बऱ्याचदा कसलीही द्वेषभावना न ठेवता चर्चा केलेल्या आहेत. परंतु त्यात त्यांना अभिप्रेत असलेली त्यांची The Republican संघटनाच चळवळ बांधणीसाठी योग्य वाटते. ज्यात आम्ही (किमान व्यक्तिशः मी तरी) कदापिही सामील होऊ शकणार नाही. रिपब्लिकन तत्वज्ञानाच्या प्रचार प्रसारातून रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी समता सैनिक दलाच्या माध्यमातून वाटचाल करण्याचा खडतर मार्ग आम्ही निवडलेला आहे. ज्यांना तो योग्य वाटतो त्यांनी सोबत करावी. ज्यांना अयोग्य वाटतो त्यांनी त्यांना अभिप्रेत कार्य करावे. असे आमचे मैत्रीपूर्ण स्पष्ट मत आहे. तेव्हा आम्ही काय करावे हे त्यांनी आम्हास सांगू नये वा त्यांनी काय करावयास हवे ह्याचा आम्हीदेखील त्यांना आग्रह धरीत नाही. आपण रिपब्लिकन चळवळीच्या सशक्त उभारणीसाठी प्रेमाखातर जी काही सदिच्छा व्यक्त केली त्याबद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत, आभारी आहोत. भविष्यात रिपब्लिकन पार्टीचा रीतसर सभासद म्हणून अधिक जोमाने मी कार्य करू शकलो तर आपलीच नव्हे तर आमचीही इच्छापूर्ती होईल व तेव्हाच मतभेदांना पूर्णविराम मिळेल अशी आशा व्यक्त करतो.
धन्यवाद. जय भीम

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.