बाबासाहेबांचा आपल्या अनुयायांना अतिशय महत्वाचा संदेश


? बाबासाहेबांचा आपल्या अनुयायांना अतिशय महत्वाचा संदेश?

“ज्या समाजात नीतीमत्ता अशा प्रकारची आहे की, ज्या कारणामुळे समाज एकवट होतो ती करणे स्तुत्य धरली जातात व ज्या कारणामुळे समाज दुभंग होतो ती करणे निंद्य निंदाजनक मानली जातात त्या समाजास जीवनकलहात यशप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. व ज्या समाजाची नीतीमत्ता अशा प्रकारची आहे की, ज्या कारणामुळे समाज एकवट होतो त्या गोष्टी निषिद्ध मानल्या जातात, त्या समाजास हार खावी लागणार आहे.”
–डॉ.बाबासाहेब आंबेडकर. ( संदर्भ Vol. 18/1 )
मित्रांनो वरील संदेशामधून बाबासाहेबांनी आपल्या उद्धाराची तसेच उद्धवस्थावस्थेची कारणे, काय केल्याने व काय न केल्याने होत असते यांवर प्रखरपणे प्रकाश टाकून स्पष्ट केलेली आहेत. ती आपण समजून घेतली पाहिजे. वरील विधानांतील प्रथम भागात बाबासाहेबांच्या संदेशानुसार “ज्या समाजात नीतीमत्ता अशा प्रकारची आहे की, “ज्या कारणामुळे समाज एकवट होतो ती करणे स्तुत्य धरली जातात” म्हणजे समाजाला एकवटावयाचे असेल, एकसंघ करावयाचे असेल तर त्यासाठी काही निश्चित गोष्टी करणे अगत्याचे ठरते. मग यांवर आपण सखोल विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की समाजाला संघटित करण्यासाठी गरज असते ती संघटनेची ! म्हणजे संघटनेच्या वतीने समाजाला योग्य/अयोग्य काय ते समाज प्रबोधनातून सांगून, शिकवून-सुशिक्षित (educate) करून, त्यांना त्याद्वारे त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड उत्पन्न करून, चेतवून (agitate) आणि अशा चेतविल्या गेलेल्या लोकांना संघटित करून (organize) त्यांना रीतसर संघटनेचे सभासद करून, प्रत्येकाने संघटनेच्या घटनेप्रती प्रचंड निष्ठा जोपासून, लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपल्या संघटनेच्या संविधानाची प्रामाणिकपणे अमंलबजावणी करणे जेणेकरून समाज लोकशाही मूल्यांना प्रत्यक्षात जगून एकसंघ होईल व त्याद्वारे आपल्या संघटनेला बळकटी प्राप्त होईल हे निश्चित आहे परंतु वरील बाबी संघटनेच्या वतीने न करता, समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषास संघटनेचे रीतसर सभासद न करून घेता, घटनेची अमंलबजावणी न करता, घटना पायदळी तुडवून लोकशाही मूल्यांना प्रत्यक्ष आयुष्यात न जगता पावलोपावली नुसता अवमान करणे इत्यादी बाबी जर समाजाकडून होत असतील आणि नुसत्या समाजाने एक झाले पाहिजे अशा पोकळ बाता मारल्या जात असतील तर असे करणे म्हणजे समाज दुभंग करण्याकडे स्वतःचा सहयोग देणे होय. तेव्हा बाबासाहेबांच्या संदेशानुसार ज्या बाबी समाज विघातक आहेत त्या करणे या जोपर्यंत निंद्य निंदाजनक मानल्या जात नाहीत तोपर्यंत त्या समाजास जीवनकलहात यशप्राप्ती होणार नाही. अशा प्रकारची नीतिमत्ता वा समज जोवर आपल्या समाजाची होत नाही तोवर आपला उद्धार होणे शक्य नाही अन्यथा ज्या कारणामुळे (उदा. डॉ. बाबासाहेबांनी जन्मास घालून दिलेल्या संघटनेच्या घटनेची अमंलबजावणी करणे) समाज एकवट होतो त्या गोष्टी निषिद्ध मानल्या जातात, त्या समाजास हार खावी लागणार आहे. ह्याची झळ प्रत्यक्षात आजघडीला या समाजास सोसावी लागते आहे. हे भीषण भयावह वास्तव कोणताही सर्वसामान्य व्यक्ती नाकारू शकत नाही. ह्या उध्वस्थावस्थेतून बाहेर पडण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे बाबासाहेबांनी जन्मास घालून दिलेल्या संघटनेच्या (RPI, SSD, BSI) संविधानाची अमंलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीने रीतसर सभासद बनून लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपली संघटना मजबूत करणे होय.
जय भीम जय रिपब्लिक भारत ?

प्रशिक आनंद
समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org

(संविधानिक रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीसाठी कटीबद्द)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.