? संघटनेला वर्तमानपत्राची अत्यावकश्यता असते.?
कोणत्याही पक्षाला वर्तमानपत्राची फार जरुरी असते. वर्तमान पत्राशिवाय आपणास कार्य करता येणार नाही म्हणून आपल्या पक्षाचे वर्तमानपत्र चांगल्या तऱ्हेने चालले पाहिजे. तुम्ही सर्वांनी त्याचे वर्गणी दार झाले पाहिजे. कौंन्सिलमध्ये तुम्ही पाठविलेले लोक तुमच्यासाठी काय करतात ते समजावून घ्यावयाचे झाल्यास तुम्हाला वर्तमान पत्रावरून समजेल. त्या करीता तुम्ही सर्वांनी त्या पत्राचे वर्गणीदार जरूर झाले पाहिजे. काही लोक इतर पत्रे घेऊन वाचतात. का? तर त्यात सट्टयाचे नंबर व भविष्ये दिलेली असतात. सट्टा खेळून कोणाचेही बरे झाले नाही. शिवाय वर्तमानपत्रात वर्तविलेले भविष्ये खरी ठरत नाहीत. आपल्या पत्राशिवाय आपल्या पक्षाचे अधिकृत कार्यक्रम व चळवळीची खरी दिशा इतर वर्तमानपत्रात वाचावयास मिळणार नाही.
शेवटी तुम्हाला मला एकच अत्यन्त महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती ही की तुम्ही तुमच्यात असलेली मानापानाची वाईट भावना काढून टाकली पाहिजे. माझे नाव आले नाही तर मी पुढे आलेल्या कार्याला विरोध करेल हि भावना अत्यन्त वाईट आहे. तुम्ही काम करा की नाव तुमच्या पाठीस लागेल.
या साठी तुम्ही संघटना इतकी मजबूत केली पाहिजे की आपल्या पैकी एकही माणूस फुटून जाता कामा नये. असे करण्याशिवाय आता आपणास गत्यन्तर नाही. तुमच्या उन्नतीची सर्व भिस्त राजकारणावरणच आहे. म्हणून तुम्ही संघटना करून मजूर पक्षाला बलवान करा.
—रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
—–संग्राहक——
उज्वला इंगोले
www.ssdindia.org