? पूर्वाश्रमीचा अस्पृश्य वर्ग (SC) जर सामर्थ्यशाली व्हावयाचा असेल तर…?
” कोणताही वर्ग अगर कोणतीही जात एखाद्या देशाच्या समाजात प्रभुत्व गाजवणारी का होते? त्या वर्गाच्या अगर जातीच्या हातात सत्ता असते म्हणून, मग ती सत्ता आर्थिक,धार्मिक, राजकीय अगर इतर कसलीही असो. ब्राह्मणांनी हे पाचसहा हजार वर्षांपूर्वी ओळखले. म्हणून ब्राह्मण लोक आपली जात सर्व हिंदूं समाजाच्या डोक्यावर मिऱ्या वाटणारी कशी करता येईल याबद्दल विचार करीत होते. त्या साठी त्यांनी वेदात चातुर्वण्यची उत्पत्ती केली. समाजाचा प्रमुख, देवळाचा प्रमुख, गावाचा प्रमुख ब्राह्मणच असला पाहिजे. ब्राह्मणांला सर्व जातीच्या बायका करता याव्यात, त्याला आपला मुख्य प्रधान, पुरोहित, सेनानी राजाने करावे वगैरे सर्व नियम मनु व इतर धर्मशास्त्रकार यांनी आपापल्या स्मृतिग्रंथात तयार करून ते हिंदू समाजाच्या बोकांडी मारले. ब्राम्हणाचे हे श्रेष्ठत्व हाणून पाडण्यासाठी ब्राम्हणेतरानी वैदिक काळात व नन्तर एकंदर सात मोठे झगडे केले. ब्राम्हण मूठभर व ब्राह्मणेतर लाखोंनी मोजता येतील असे असतांनाही या झगड्यात ब्राम्हणेतरांना हार खावी लागली. कारण ब्राह्मणेतर लोक हे ब्राम्हणी जातीभेदाच्या विषाने मानवी सद्गुणांना मुकलेले होते. तेव्हा अस्पृश्य वर्ग (SC) जर सामर्थ्यशाली व्हावयाचा असेल तर त्याच्या हातात राजकीय व आर्थिक सत्ता आली पाहिजे. त्यासाठी आपापसातील मतभेद सोडून द्यावेत व शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (Predecessor of RPI) मध्ये सामील व्हावे. तुम्ही राजकीय सत्ता प्राप्त केली की, आर्थिक ,सामाजिक आणि सांस्कृतिक सत्ता मिळवण्याचे मार्ग तुम्हाला मोकळे होतील.”
(संदर्भ Vol.18/2)
__ रिपब्लिकन पार्टी चे संस्थापक डॉ.बाबासाहेब आंबेडकर
?जयभीम?
—–संग्राहक—–
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org
(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)