हिंदूंचे सण


जय भीम मित्रांनो ?

दिवाळी (हिंदूंच्या अनेक सणांपैकी एक मोठा सण) या विषयावर काहीसा गांभीर्याने विचार केल्यावर एक बाब मला आपल्यापुढे मांडाविशी वाटते ती अशी की, बाबासाहेबांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या भारताच्या इतिहासावर लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथात कुठेही दिवाळी, दीपदानोत्सव किंवा बळीराजा याच्या अस्तित्वाविषयी काहीच लिहिलेले आढळत नाही. दुसरे असे की बाबासाहेबांनी या देशाच्या इतिहासाविषयी सांगतांना असे स्पष्ट केले आहे की या देशाचा इतिहास दुसरा-तिसरा काहीही नसून बौद्धवाद (Buddhism) आणि ब्राह्मणवाद (Brahmanism) यांच्यातील जीवघेण्या संघर्षाचा इतिहास आहे….ज्याला दुसऱ्या शब्दांत क्रांती (Buddhism) आणि प्रतिक्रांतीचा (Brahmanism) इतिहास म्हटल्या जातो. तेव्हा आता इतिहासातून ज्ञात झालेला आमच्या पुढे बौद्धवाद आणि ब्राह्मणवाद हे दोनच विकल्प उभे राहतात ज्यांपैकी आम्ही विषमतावादी ब्राह्मणवाद नाकारून समतावादी बौद्धवाद स्वीकारला आहे आणि क्रांतीचा मार्ग अवलंबविला आहे आणि हा मार्ग अवलंबवितांना आम्हाला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माच्या अनुषंगाने Reconstruction of the world (society) (संदर्भ-Vol 18/3) हे करायला सांगितले आहे.. तेव्हा जुन्या हिंदुत्वाच्या रुढीवादी, परंपरा, सणोत्सव यांना मूठमाती देऊनच नवनिर्मितीकडे आपली वाटचाल असायला हवी असे मला व्यक्तिशः वाटते आहे..त्याला कारणही तसेच आहे..कारण विषमतावादी ब्राह्मणवाद हा इतका संसर्गजन्य आहे की जरी इतिहास काळातील काही पुराव्यानिशी आपण मागेपुढे दिवाळी वा दीपदानोत्सव अशा सणांचा जरी सहसंबंध बौद्ध संस्कृतीशी जोडण्यात यशस्वी झालो तरीही पिढ्यानपिढ्या हिंदुत्वाच्या जोखडाखाली या देशात जो सांस्कृतिक ब्राह्मणवाद पसरविल्या गेला आहे त्याला आपण कितीही शुद्ध करून अंगिकारतो म्हटले तरीही त्यांचे अंश आम्हाला आता हानिकारकच होणार..जसे बुद्धाने ब्राह्मणवादाविषयी म्हटले आहे की, It can not be amended, it can only be ended. (संदर्भ-TBHD) तेव्हा आपण या सर्व बाबींचा अगदी गांभीर्याने विचार केला तर मला असे जाणवते की आपण दिवाळी वा दीपदानोत्सव हे जर बौद्ध संस्कृतीशी जुडलेला सणोत्सव म्हणून मान्य केला तर मग जसे या देशात जैन, शीख धर्मियांचे वेगळे धर्मवादी अस्तित्व असतांनाही आजघडीला ब्राह्मणवादाने त्यांना जसे व्यापून गिळंकृत केले आहे आणि ते धर्मही आता हिंदू संस्कृतीचा एक भाग म्हणून आपणांस वास्तविकतेत दृष्टीस पडतात तशीच काहीशी आपली अवस्था होण्याचा मोठा संभाव्य धोका नाकारता येत नाही.

तेव्हा आपली (बौद्धांची) भूमिका हि खंभीर असायला हवी..आम्ही तडजोडीचा मार्ग अवलंबून समरसतेत सामील होता कामा नये.. नवनिर्मिती हेच आम्ही सूत्र अवलंबिले पाहिजे. पांडुरंगाची मूर्ती हि बुद्धाची मूर्ती आहे असे बाबासाहेबांनी जरी आम्हास सांगितले पण आम्हाला त्या पांडुरंगाच्या चरणी लोळायला आणि त्याच्या वाऱ्या करा म्हणून त्यांनी कदापिही उपदेश केलेला नाहीये. तिरुपती बालाजी, जगन्नाथ पुरी इत्यादी ठिकाणी बौद्ध संस्कृतीचाच ठेवा होता हे जरी इतिहासातून सिद्ध होऊ शकणारे असले तरीही आता मात्र आपण त्याच्या मागे लागून ब्राह्मणवादी संस्कृतीची घाण कुठपर्यंत साफ करीत राहण्यात स्वतःला धन्य मानायचे?? आणि मुख्य म्हणजे या सर्व बाबींचा आमच्या धम्माशी (मनुष्या-मनुष्यातील सदाचारी व्यवहार) काय संबंध??कारण आमचा विषय मानवकल्याणाचा (धम्म) आहे.. मनसंवर्धनाचा आहे मनोरंजनाचा नाहीये…बुद्धाचा परिवर्तनवाद स्वीकारून नवनिर्मितीकडे वाटचाल करणे आणि जगाची पुनर्रचना करणे हाच एकमेव तोडगा आम्हा नवा जन्म घेतलेल्या, बौद्ध झालेल्या आंबेडकरी समाजबांधवांपुढे आहे. तेव्हा आम्ही बहुजनवादाच्या (जाती जोडो मानसिकतेला बळी पडून समरस होण्याच्या) भानगडीत न पडता क्रांतिकारी बौद्धवादाचेच पाईक झालो पाहिजे आणि ज्या-ज्या विषयांना ब्राह्मणवादी संसर्ग झालेला असेल त्याला बाजूला सारून विवेकवादी बौद्ध सांस्कृतिक बाबींची नव्याने या देशात पायाभरणी केली पाहिजे हेच मला यांतून आपणांस सुचवावेसे वाटते.
(लेखन : ऑक्टोबर 2016)

जय भीम
प्रशिक आनंद
समता सैनिक दल
HQ, दीक्षाभूमी नागपूर
www.ssdindia.org

(रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुर्णबांधणीसाठी कटिबद्ध)

टीप: वाचकांनी वरील लेख हिंदूंच्या सणानुरूप बदल करून (दिवाळी, दसरा, होळी, नागपंचमी इत्यादीसारखे सण लक्षात घेऊन) वाचावा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.