घटनेतील संकेत आणि नीतीच्या राजकारणाची आवश्यकता


? घटनेतील संकेत आणि नीतीच्या राजकारणाची आवश्यकता?

” प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्व आहे. देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हावयाची असेल तर सरकार व जनता या उभयतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती याचे पालन करणे आवश्यक आहे.
सरकार बनविण्याच्या पध्द्तीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र विचार करण्याची सवय व बहुसंख्याकांच्या नियमांचे पालन. त्याच प्रमाणे सरकारनेही पुढील गोष्टी पाळल्या पाहिजेत:-
देशातील बहुसंख्य लोकांचा आपल्यावरील विश्वास उडाला आहे, असे दिसून आल्यास घटनात्मक नितीस अनुसरून सरकारने आपल्या अधिकारपदाचा त्याग केला पाहिजे. अल्पसंख्याकांबद्दल आदर बाळगला पाहिजे शेवटीची गोष्ट म्हणजे राज्यशासन निष्पक्षपाताने चालविले पाहिजे.
आपल्या समाजातील निरनिराळ्या लोकांची राहणी व विचार करण्याची पात्रता या गोष्टी विचारात न घेता केवळ तात्विक बाजू विचारात घेऊन घटना बनविणे या गोष्टी मुळे जगातील अनेक घटना अयशस्वी ठरतात. अधिकारावर असलेल्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की घटना करण्याचा व राज्यकारभार करण्याचा अधिकार त्यांना जो मिळालेला असतो तो काही अटीवर लोकांनीच दिलेला असतो. सरकारने चांगला राज्यकारभार करावा याच अटीवर लोकांनी त्यांना वरील अधिकार दिले असतात. त्यांना जर ही अट पूरी करता येत नसेल तर सरकारने आपली अधिकार सूत्रे खाली ठेवली पाहिजेत.
अल्पसंख्याकाबद्दल सरकाने आदर बाळगला पाहिजे. अल्पसंख्याकांना आपली मते मांडण्याची योग्य संधी असावी. याच पायावर पार्लमेंटरी लोकशाहीची उभारणी झालेली आहे. जुन्या घातूक प्रवृत्तीवर मात करून क्षुद्रवृत्ती आणि जातीयता यांना थारा न देता राष्ट्रात हुकूमशाही निर्माण होणार नाही व कोणत्याही प्रकारचा छळ राष्ट्रात चालणार नाही अशी खबरदारी घेऊनच लोकांनी वागावे.”

__ _रिपब्लिकन पार्टी चे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संदर्भ vol 18/3)

?जय भिम?
——संग्राहक—–
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org

(रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.