? उठा, जागे व्हा आणि निधडेपणाने आपली राजकीय शक्ती मजबूत करा.?
” भयभीताचे राजकारण आज चालणार नाही. आपल्याला जे पटते ते उघडपणे मांडले पाहिजे. त्यात सोंग व ढोंग किंवा लपवाछपवी नको. ज्या राजकारणामुळे लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. जनतेत अग्नी आहे पण तो वारंवार फुलवला पाहिजे. नाही तर अग्नी आहे त्याच स्थितीत राहिल्यास राख होऊन तो खलास होईल. तसेच तुम्हाला ज्या मार्गाने जायचे आहे त्या मार्गाने निधडेपणाने जावे. सरकारच्या कायद्याची वा तुरुंगाची भीती बाळगू नका. तुरुंगात घातले तर त्यात वाईटही वाटून घेण्याचे कारण नाही. जो प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा मी केला आहे त्या खाली हे सरकार उद्या मला देखील अडकवून ठेवील. पण त्याची खंत बाळगण्याचे कारण नाही. कारण राजकारण हा क्रिकेटचा खेळ आहे. त्यात पराभूत झालेला जिंकणारच नाही कशावरून? पण पराभूत झालेल्याने निराश होऊन सामना गुंडाळून बसता कामा नये.”
__ *रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर_*
(संदर्भ Vol 18/3 दि.25 डिसेंबर 1952)
?जयभीम?
—संग्राहक—
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org
(रिपब्लिकन पार्टी च्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)