शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4


?शिवाजी महाराज आणि☀ डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

प्रतेक अम्बेडकरी व्यक्तिनी जरुर वाचावे? खुप गैरसमज आहेत शिवाजी अणि बाबासाहेबाबद्दल…..‼

मुद्दामपणे शिवाजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा खोटा इतिहास मराठा संघ,संभाजी ब्रिग्रेट ह्या संघटना चुकीच्या गोष्टी घुसडवण्याचा प्रयत्न करतात, कुठलाही अभ्यास नसलेली व्यक्तीच अशे करू शकते❗ प्रत्येक महापुरुषाची स्वतःची ओळख वेगळीच असते त्या त्या काळाची परिस्थिती त्यातील बदल त्या काळानुरूप महापुरुषाकडून होतात .शिवरायांनी मावळ्यांना एकत्र करून राजकीय बदल केला परंतु त्यांना धार्मिकतेचा डोंब ब्राह्मणी हिंदू परंपरा असल्याने सामाजिक बदल करण्यात ते अयशस्वी झालेत हे एक सत्य आहे .‼

1:- महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी “जय शिवरायच्या” घोषणा दिल्या. बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात शिवरायांचे दर्शन घेवून केली.
❎❌

– –> ?सदर पहिला मुद्दा पोष्ट करणाऱ्याने टाकलेला आहे .यात सत्याग्रहाची सुरुवात शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली हे म्हणणे अगदी अज्ञानी वृत्तीने आणि कुठलीही माहिती न घेता केलेले आहे .महाडचा ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह २० मार्च १९२७ ला झाला .अनेक इतिहासाची पाने चाळली अनेक खंड जरी चाळून बघितले तरी बाबासाहेब चवदार तळ्याच्या सत्याग्रहापुर्वी रायगडावर गेलेच नव्हते त्यामुळे रायगडावर जाऊन दर्शन घेऊन सत्याग्रहाची सुरुवात केली हे चुकीचे आहे .बाबासाहेब रायगड किल्ला बघण्यासाठी आपल्या अनेक लोकांसोबत २९ डिसेंबर १९२७ ला गेले होते तेंव्हा रात्री आपल्या अनुयायासोबत मुक्काम केला असता ,बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी ५० ते ६० मराठा लोक बंदुकी ,हत्यारे घेऊन गडाच्या दिशेने निघाल्याची बातमी महार कार्यकर्त्यांना कळाली तेंव्हा रात्री गडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर जमल्यामुळे मराठा समाजातील हल्लेखोर तिथे भीतीने येउच शकले नाही .( संदर्भ – भीमराव रामजी आंबेडकर खंड ३ ,ले .चांगदेव भगवानराव खैरमोडे , पा.नं .२१३ ). उलट हा प्रकार होऊन केसरी या वृत्तपत्राने तत्कालीन आमदार नारायण गुंजाळ यांचे बाबासाहेबांच्या वरील आक्षेपार्ह्य भाषण छापून ‘आंबेडकर यांनी शिवाजीच्या सिंहांसनावर बसून सिंहासन भ्रष्ट केले’ अशी बातमी दिली. त्यावर बाबासाहेबांनी नारायण गुंजाळ आणि केसरी चे संपादक नरसोपंत केळकर यांना नोटीस पाठवली .त्याही नंतर “कुलाबा समाचार “ या वृत्तपत्राने “डॉ .आंबेडकरांच्या रायगडावरील लीला “ असे हेडिंग देऊन आगपाखड केली. यानंतर रा .चित्रे ,सहस्त्रबुद्धे या सारख्या ब्राह्मणमंडळींनी बाबासाहेबांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी मराठा समाजाला समजवण्यासाठी व्याख्याने दिली .

2:- बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूने म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते
—>? माझ्या माहितीप्रमाणे असं कुठलही व्याख्यान बाबासाहेबांनी दिलेलं नाही जर असेल तर त्याचा संदर्भ द्यावा .

“3:- बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहतांना पत्राची सुरुवात
“जय शिवराय” लिहून करत होते. महाराष्ट्र शासनाने हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत.”

—> ?महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या या खंडात एकूण २३६पत्रे आहेत.या ग्रंथाची एकुण पृष्ठ संख्या ४३४ आहे. त्यातल्या नेमक्या कोणत्या पत्राची सुरूवात बाबासाहेबांनी “जय शिवराय” लिहून केलीय हे समजून घ्यायला मला आवडेल.निदान या खंडात तरी असे एकही पत्र नाही. मी बाबासाहेंबांची इतरही प्रकाशित / अप्रकाशित पत्रे पाहिलेली व वाचलेली आहेत. माझ्या पाहण्यात तरी असे कोणतेही पत्र आलेले नाही. हे खुद्द महाराष्ट्र शासनाच्या “डॉ .बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे” प्रसिध्द करणाऱ्या प्रा .हरी नरके यांच मत आहे त्यामुळे बाबासाहेबांना कनिष्ठ दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. दोन्ही महापुरुष आपापल्या ठिकाणी योग्य आहेत असे दिसत असले तरीही वर्णव्यवस्थेत शुद्र ठरलेल्या जातीसाठी हा प्रकार करणे अगदी चुकीचा आहे कारण या शुद्रांचे मुक्तिदाते फक्त बाबासाहेबच आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

“4:- ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे शिवरायांचा राज्याभिषेक ब्राम्हणांनी नाकारला होता.तो मनुस्मृती हा ग्रंथ बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला.”

– –> ?वरील मुद्दाही अगदी हास्यास्पद आहे . शिवरायांच स्वराज्य ,बहुजन मावळ्यांना सोबत घेऊन मिळविलेल स्वराज्य राजकीयदृष्ट्या अगदी सत्य आणि आदरणीय असलं तरी त्याकाळी धार्मिक सत्ता जे ठरवील, वैदिक परंपरा जे सांगेल तेच केल्याशिवाय त्याला मान्यता नव्हती . याबद्दल खुद्द डॉ .बाबासाहेब आंबेडकर आपल्या Who were Shudras? अर्थात शुद्र पूर्वी कोण होते ? या ग्रंथात पान.क्र. १९५ वर लिहितात कि “ शिवाजी एका स्वतंत्र राज्याचा राज्यकर्ता होता व त्यानी स्वत :ला महाराजा व छत्रपती हे खिताब घेतलेले होते. त्याच्या प्रजेपैकी बरेचसे ब्राम्हण होते. अशी परिस्थिती होती तरीसुद्धा आपला राज्याभिषेक विधी करवून घेण्याच्या बाबतीत शिवाजीला एकाही ब्राम्हणावर सत्ता गाजविता आली नाही. राज्यभिषेकाचा विधी जर कायदेशीर ठरवायचा असेल तर तो ब्राम्हणाच्या हातून झाला पाहिजे ही गोष्ट शिवाजीच्या उदाहरणावरून स्पष्ट झालेली आहे, म्हणून ते उदाहरण महत्वाचे आहे .राज्याभिषेकाचा विधी जर ब्राम्हणेतराच्या हातून करण्यात आला तर तो विधी सफल होत नसतो. म्हणजे तो वांझ ठरतो .” यावरून ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना चातुर्वर्ण वैदिक परंपरेत मनुस्मृती नुसार शुद्र ठरविले होते परंतु शिवाजी महाराजांनी काशीच्या गागा भट ला अमाप संपत्ती देऊन हा विधी घडवून आणला होता एकंदरीत ब्राह्मणी व्यवस्था तोडण्याऐवजी शिवाजी महाराजांनी त्याच व्यवस्थेत राहून त्याच पालन राज्याभिषेकासाठी करणे उचित मानले होते. राज्याभिषेकासाठी होणारा विरोध डोळ्यापुढे असूनसुद्धा त्या वर्णव्यवस्थेच्या बेड्या तोडण्याच्या धाडसाऐवजी त्यात राहणेच उचित समजले होते. हे ही ऐतिहासिक सत्य आहे त्यामुळे वरील मुद्द्यातील राज्यभिषेक आणि मनुस्मृती दहन याचा कसलाच सबंध नव्हता. याऊलट बाबासाहेबांनी मनुस्मृती मधील अमानवीय गोष्टीना विरोध म्हणून मनुस्मृतीचे दहन करुन ब्राह्मणी हिंदू व्यवस्थेला छेद देण्याचे सर्वश्रेष्ठ धाडस दाखविले होते आणि शूद्रांना मानवतेची जाणीव करून दिली.

“5:- बाबासाहेब म्हणतात संविधान लिहते वेळी मला जास्त ञास झाला नाही कारण छञपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होते. म्हणूनच मी संविधान लिहु शकलो.”

– –>? वरील मुद्दाही अगदी हास्यास्पद आणि खोडसाळपणाचा आहे . डॉ .बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिताना अत्यंत कष्ट घेतले होते प्रचंड अभ्यास केला होता .५२ देशांच्या घटनांचा अभ्यास तसेच बाबासाहेबांच्या लिखाणात वाचनात, प्रदीर्घ अभ्यासात बुद्धकालीन तत्वज्ञानाचा इतिहास होता त्यामुळे बुद्धकालीन गणराज्य पद्धती जी लोकशाही मार्गाने निर्णय घेत असत त्यात अनेक गणराज्य होती. लीच्छ्वी सारखी गणराज्ये होती जी लोकशाही पद्धतीने राज्य करीत होती .तसेच तथागत बुद्धाच्या समता ,स्वातंत्र्य ,बंधुत्व ,न्याय या तत्वांचा अंतर्भाव राज्यघटनेत बाबासाहेबांनी केलेला होता . त्यामुळे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते म्हणून संविधान लिहू शकलो ही वाक्ये टाकणे म्हणजे हा मूर्खपणा आणि खोडसाळपणा आहे असे मी समजतो यात शिवाजी महाराजांचा विरोध अजीबात नाहीच पण अशा पोष्ट प्रसारित करणाऱ्या मूर्ख लोकांच्या अडाणीपणाची कीव वाटते . शिवाजी महाराजांचं स्वराज्य राजकीयदृष्ट्या सत्य जरी असलं तरी धार्मिक ,सामाजिक ,शैक्षणिक दृष्ट्या अस्पृश्य ,शुद्रातीशुद्र लोकांना जातीयव्यवस्थेच्या पायथ्याशीच राहावे लागत होते. निवडक प्रतिनिधित्व किल्लेदार ,जहागीरदार महार, अस्पृश्य लोक जरी असले तरी त्यांचे प्रमाण प्रातिनिधिक स्वरुपात होतं. शिवाजी महाराजांना राजकीयदृष्ट्या अधिकार जरी असले तरी सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक बदल करण्याचा अधिकार नव्हता. अस्पृश्य महार लोक निवडक किल्लेदार ,जहागीरदार जरी असले तरी त्यांना अष्टप्रधानमंडळात कुठे स्थान होत ? अष्टप्रधानात असलेल्या मंत्रीमंडळात मोरोपंत त्रिंबक पिंगळे, रामचंद्र निलकंठ, अण्णाजीपंत दत्तो, दत्ताजीपंत त्रिंबक, हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, निराजीपंत रावजी, रघुनाथराव पंडीत या सारख्या मंडळीमध्ये अस्पृश्य शुद्रांतीशुद्र वर्ग कुठे होता? आजही पडका सिंहगड किल्ला निरखून पाहिला असता “महार टाके” ,”मराठा टाके” असे पिण्याचे पाण्याचे हौद त्याकाळी वेगवेगळ्या स्वरुपात होते त्यामुळे शिवाशिव, बाट ,अस्पृश्यता त्याकाळी होतीच. एक राजा म्हणून एक आदेश जर शिवरायांनी दिला असता तर एका आदेशाने अस्पृश्यता जातीयता नष्ट होऊन समानता निर्माण झाली असती. तिथे खरच स्वराज्य समानतेवर असत तर मग बाबासाहेबांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या ,तिथे खरच स्वराज्य समोर असत तर संविधान लिहिण्याची गरजही पडली नसती .

“6:- बाबासाहेब आंबेडकर लहान असतांना “कृष्णराव. अर्जुन केळुस्कर” गुरुजींनी त्यांना “बुद्ध चरित्र”
भेट दिले होते. या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली. केळुस्कर गुरुजी जन्माने”मराठा” होते.”

—> ?हे जरी खर असलं कि केळुस्कर गुरुजींनी शालेय जीवनात बाबासाहेबांना सदैव प्रेरणा दिली पण त्यांची जात मराठा होती म्हणून जातीसाठी अशा पोष्ट्द्वारे गवगवा करणे योग्य वाटत नाही . बाबासाहेबांनी पुढे चालून प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आणि सर्वश्रेष्ठ बौद्ध धर्माची निवड केली त्यामुळे मराठा जातीमुळे केळुस्कर श्रेष्ठ ठरले आणि त्यांनी बुद्धचरित्र भेट दिल म्हणून बाबासाहेबांना धर्मांतर करण्याची प्रेरणा मिळाली असे म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी होय. असं असेल तर केळुस्कर गुरुजींनी अगोदरच बौद्ध धर्म स्वीकारला नसता का ?

“7:-छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर “बैरीस्टर” झाल्यावर, त्यांची कोल्हापूर शहरात रथातून मिरवणूक काढून फुले उधळली होती.”

—> ?अगदी बरोबर शाहू महाराजांनी जे बाबासाहेबांना जातीच्या बाहेर जाऊन हेरल होत ते सवर्ण जातीत अडकणारे जातीचाच विचार करू शकतात त्याही काळात शाहू महाराज अस्पृश्यांसाठी सामाजिक बदल करीत होते तेंव्हा आता जे त्यांना जातीत गोठवण्याचा प्रकार करणारे आहेत त्यांना हे चांगले माहित असायला हवेत कि  हेच लोकं त्यांना “धेडांचे-महारांचे राजे” म्हणून उल्लेख करत .

“8:-राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते. सयाजीराव गायकवाड जन्माने मराठा होते…..”

—> ?परत इथे जातीच्या किडलेल्या मनाचा दुर्गंध येतो सायाजीरांवाना जातीच्या बेड्यात अडकवून केवळ ते मराठा होते म्हणून श्रेष्ठ होते आणि त्यांनी बाबासाहेबांना परदेशात जाण्यासाठी सहाय्य केल .मुळात सयाजीराव गायकवाड यांच्या प्रशासनात नियम होता कि जे जे विद्यार्थी निष्णात आहेत ,हुशार आहेत मग ते जातीने ,कुळाने कुणीही असो त्यांना शिक्षणानासाठी आर्थिक सहाय्य करणे अर्थात आजच्या भाषेत बँकाप्रमाणे ऋण (Educational Loan) देणे आणि त्याची परतफेड आपल्या संस्थानामध्ये नोकरीमधून त्या विद्यार्थाचे कर्ज परतफेड घेणे अर्थात बाबासाहेबांनी परदेशातून परत आल्यावर पिता रामजीचा विरोध पत्कारून बडोदा संस्थानात प्रचंड जातिवाद असताना सुद्धा नोकरी करून त्यांचे ऋण फेडले अर्थात रामजीबाबाना बडोदा मधील हे जातीचे चटके त्रास माहित होता म्हणून ते बाबासाहेबांना जाण्यापासून रोखत होते .तरीसुद्धा बाबासाहेबांनी चटके सहन करून संस्थानाच्या कराराच पालन केल .

“9:- बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघटीत व्हा हा संदेश मराठा बहुजनांना दिला.
“चांभार घराण्यात जन्माला आलेला नेपोलीयन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. अरे ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेंसमन हेरॉलड ब्रीटन चा पंतप्रधान झाला. लहानपणी कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरीकेचा राषट्राध्यक्ष झाला अरे पण माणुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला आपला ‘भिमराव’ या देशाचा शिल्पकार झाला……….! “

– –>? सदर मुद्यात बाबासाहेब देशाचे शिल्पकार आहेत हे डोळे लावून सत्य असलं तरी शिकवा, चेतवा आणि संघटित करा हा संदेश भारतातील समस्त रिपब्लिकन जनतेसाठी दिला त्यालाही विशिष्ट जातीलाच दिला किंवा केवळ मराठा बहुजनांना दिला असा नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकास त्याच्या मानवमुक्ती साठी दिलेला आहे. युरोप खंडात जातीव्यवस्था किंवा जात नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती ना आहे ही जातीयव्यवस्था आणि चातुर्वर्णव्यवस्थेत शुद्रातीशुद्र ठरविलेली जात नेपोलीयन बोनापार्ट ला लावणे केवळ हास्यास्पद गोष्ट आहे .

?सदर पोष्ट अनेक महिन्यापासून सोशल मिडिया मध्ये फिरतात आणि काही जण अभ्यास न करता इतिहासाची जाण न ठेवता सदर मजकूरच प्रमाण आहे असे मानून तोच खरा इतिहास मानत असतील तर हा निव्वळ अडाणीपणा आहे .इथे बाबासाहेब आंबेडकर ,शाहू महाराज यांना जातीचे लेबल लावून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे उपकार केलेले आहे अस भासवून जातीचा अंहभाव दाखविणे आणि महापुरुषाचा जय जयकार करणे दोन्हीही विरोधाभासी आहे. शिवाजी असो कि शाहूमहाराज त्या त्या काळानुरूप या महापुरुषांनी काळाचा विचार करून पाऊले उचलली आहेत. शिवाजी महाराजांची सामाजिक बदलापेक्षा स्वराज्य मिळवणे अग्रणीय मानले ती त्या काळाची गरज म्हणून आणि बाबासाहेबांनी सामाजिक बदलासह मानवजातीच्या अधिकारासाठी मानवमुक्तीचा लढा दिला तो या सर्वांपेक्षा सर्वश्रेष्ठच आहे यात दुमत असूच शकत नाही. त्यामुळे सदर अश्या अनेक पोष्ट आहेत ज्यात बाबासाहेबांशी जोळून दुसर्याला मोठ करण्यात आलेले आहेत  म्हणून मला खोट्या आधार नसलेल्या गोष्टींचा गवगवा यांचे खंडण करावे वाटले म्हणून हा सदर लेख .

– प्रशिक आनंद

विचार प्रचारक-प्रसारक
द्वारा: समता सैनिक दल
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org

( संविधानिक रिपब्लिकन पार्टी च्या पुन्रबांधणीस कटिबद्ध)


Leave a Reply to bharat londhe Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.

4 thoughts on “शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • सौरभ गायकवाड

    किती तो अनादर ठासून भरला आहे ह्या पोस्ट मध्ये शिवाजी महाराजांन बद्दल ,शिवाजी महाराजांचा नाव एकेरी आणि बाबासाहेब बरोबर घेतलं आरे कुठे फेडाल हे पाप ,मी शिअवजी महाराज आणि बाबासाहेब ह्या दोघांना मानतो ,तुम्ही जो मराठा समाज आणि शिवाजी महाराज ह्यांच्या बद्दल जनतेत विष पसरवत आहेत न त्याची परतफेड वरती गेल्यावर होईल मी बोलून काही होणार नाही

  • Aryan

    Lekh jari kalaktmak asla tari yala suddha purave nahit.Shevti praahn urto to jaticha.shevti donhi bajune tatkalin paristhitil char don kharab dokyachi udaharne deun jati badnam kelya jatat.deshat samanta aahe hi gost tyasathi ayushvechnare..fule,gandhi,karve,shahu,sayajirao,tatkalin sattetil congress aani Dr. aambedkaranchi nemnuk karnare nehru jyanchya hatat sarv satta hoti ase lok jyani samanra tatwala pathimba dila he sarv lok hi titkech mahtwache aahet..aani yek bhartawar english lokanche rajya hite aani tyana aspeushta manya navti tar he english lok pan tevdech mahtwache aahet.asprushta nirmulan,mahila sarakshan ya sarv gosti tyanchya kalat zaleya aahet..Ambedkar great hote..yacha arth asa hot nahi ki dusrya jatina..brhaman ,maratha sarkhya jatincha dwesh karne tyanchi badnami karne…tya jatitil gairprawarttis jababdar lok laksya kele tar jatiysta kami hoil annnytha ..karodo samannya garib brhamman,maratha lokancha aapman muthbhar kharab lokasathi kela asach tyacha aarth hoto.

    Tumchya lekhacha arrth asa hoto ki babasahebani fakt manusmruti aani brhaman samajacha aabhyas aani tyatil wait gosticha aabhyas kela..tumala thode kahi tari watle pahije ki babasaheba sarkhya mahan vyaktila shivaji maharaja baddal kahi mahit navte..udya mhanu naka ki te maharastrachya matiche navte..babasaheb great hote pan tyani shivaji maharaja baddal kahi bolale astil kahi kary kele asel te tumhi samor aanane garjeche aahe ..tumhich jar brhamanani..muslim ..british sattadishatil lokani rachalela kalpnik itihas purava mhanun mannya karat asal tar deshache durdaiv aahe..itihas ha jo to sattadhish jyachya tyachya soipramane lihato..muslim itihaskar marathyani kitihi changli kamhiri keli tari tyache srey marathana deil pan muslim dharmala kami lekhnar nahi.tyane itihasat pan tasech kele,british lokani tasech kele ..
    Mhanun vinanti ki shivaji he aambedkaranchya purvi 250 varsh aagodar hote..shivrayanchi sarvsamaveshkta tyanchya bara balutedarache yekch nav Rayat..aani rayateche swarjya yatun disun yete..shivaji maharajanantar ..brhaman peshwyani marathyanchi rajkiy satta kabij keli ..tarabai sarkhya yoddhinicha aapman kela..satarchi gadi nammatra keli marathyancha aapman kela..pudhe engraj lokani desh phoda va rajya kara madhe vibhagla..aani nanatar aambdkar janmale ase sabgana lokana..shivaji maharaja nantar 250 varsh gelyanantar aambedkar janmalet aani jagachi nisrgachi rit aahe ki bhutkalat aalelya aanubhawancha aabhyas lok kartat..tasa aambedkarani aabhyas kela asel na shivrayancha tyanchya kalat ki tyana navte mahit kahich shuvrayabaddal aani jar asel tar tumchya sarkhya lokanich te puravyanushi siddh kele pahije..nahitar yacha aarth asa hoil ki yek mahan neta tyachya 250 arsh aagodar janmalelya mahan kary karun gelelya vyaktibaddal adnyani hota..krupaya kamala laga shivraya baddalche je kahi vichar,bhashan,aabhyas,lekhan,aambedkarani tya kali kele te ujedat aana aani tyanchya dbyanachi aankhi yek baju jaga samor manda..

  • Narayan

    शिवाजी महाराज स्वपाक्रमी राजा होते त्यांना बाल मित्र होे.त्यांचे स्वातंत्र्याचे ध्येय 16 वर्षी शपथ घेऊन चालू झाले. आंबेडकर हे राजकारणी व समाजसेवक होते.आंबेडकरांना वेळो वेळी इतर जातीच्या ोकांनी मदत केली..आंबवडेकर गुरुजी ब्राह्माण होते त्यांनी त्यांना स्वतःचेाव दिले.केळुस्कर (ब्राह्माण) गुरुजीनी आंबेडकंना शिष्यवृत्ती मिळवून दिली.सयाजीराव गायकवाानी (मराठा) ंबेडकरांना मदत केली .शाहू महााजांनी आंेडकरना मदत केी हेच शाहू महाराज शिवाजी महाराजांच्या गादीचे वंशज होते .पंडित नेहरूंनी (ब्राह्माण) पंतप्रधान असताना ठरवे असते तर ुसऱ्या व्यक्तींना घटना बनवायला देता अली असती त्यांना पण त्यांनी योग्यतेचा विचार करून आंबेडकरांना हरलेले असताना सुद्धा मंत्री पद दिले व घटना लिहण्याचे काम दिले.महात्मा फुले (माळी) त्यांची प्रेरणा होते.
    समाजात फक्त नकारात्मकता सांगू नका केलीली मदत हि सांगा .यामुळे सलोखा टिकेल .
    प्रश्न असा कि काय आंबेडकर सारख्या ज्ञानी माणसाच्या आयुष्यात शिवाजी महाराजा बदद्दल एवढे अज्ञान असावे कि ते त्यांच्या बद्दल भृ सुद्धा बोलले नसतील .आणि असतील तर काय बोलले लिहले आहे..ते जर हजार वर्षांपूर्वीचा इतिहास शोधत होते तर त्यांना त्याकाळात 250 वर्षापूर्वीचे शिवाजी महाराज शिवाजी महाराज माहित नव्हते असा याचा अर्थ होतो..एवढी घटना लिहली ,ब्राह्माण द्वेष लिहला असेल ब्राह्मणवाद वाईट..पण शिवाजी महाराजा बद्दल महाराष्ट्रात जन्मलेल्या या महापुरुषाने 65 वर्षात कधीच शिवाजी महाराजा बद्दल काही ऐकले,वाचले ,बोलले नाही का…बोलले तर तुमची जबादारी ते जगासमोर मांडण्याची उगाच महा पुरुषसना अगोदरच्या महापुरुषाची माहिती नाही व नव्हती असे दाखवून अज्ञानी ठरवू नका.शिवाजी महाराज हे आंबेडकर पूर्व 250 वर्ष असतील आणि एक मातीतील असतील आणि माहित नव्हते असे दाखवत असाल तर आंबेडकर अज्ञानी होते असा अर्थ होऊ शकतो.इतिहास शोधा आणि आंबेडकरांना आणखी ज्ञानवंत करा.