? आपली पार्टी – आपली माणसं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ?
? भावी निवडणूक म्हणजे आपल्या जीवन मरणाचा संग्राम आहे. ?
४ ऑक्टोबर, १९४५, पुणे येथे बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर निवडणुकीबाबत आपल्या भाषणात म्हणतात,?
“मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की ?आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्या शिवाय आपला सामाजिक व धार्मिक उध्दार होणे अशक्य आहे.?
आपणास समता आणि स्वातंत्र्य मिळवावयाचे असेल, आपणास इज्जतीने जगावयाचे असेल, आपली प्रगती करून घ्यावयाची असेल तर या देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहीजे. राजकीय सत्ता हे एक प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्रास आपण देवाप्रमाणे मानले पाहीजे. आपण या शस्त्राची पूजा करवयास पाहीजे, म्हणजे या शस्त्राचा उपयोग आपणास आपल्या शत्रूंवर करता येईल. हे शस्त्र मिळविणे आगामी निवडणुकीवर अवलंबून आहे. म्हणून भावी निवडणूक म्हणजे आपल्या जीवन मरणाचा संग्राम आहे. या निवडणुकीवर आपल्या जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न अवलंबून आहे. या जीवन मरणाच्या दारूण संग्रामात आपण विजयी-यशस्वी झालेच पाहीजे. हा लढा जिंकण्यासीठी आपण जय्यत तयारी केली पाहीजे. या जय्यत तयारीस आपण आतापासूनच लागले पाहीजे.”
__ रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(Ref.DBA W&S Vol.18/Part- 2/P. No. 551)
??जय भिम-जय भारत??
www.republicantimes.in