? स्वतःच उद्धार स्वतःच करायचा असतो.?
” आपला उध्दार कराया आपणच कंबर कसली पाहीजे. हे काम एका दोघांचे नाही. यात अनेक लोकांनी आपल्या छातीचा कोट करून आपली माणुसकी स्पृश्य लोकांपुढे सिध्द करून घेतली पाहीजे. या कामात अनेकांचे जीव जातील. आपल्या पुर्वजांनी रणांगणांत आपल्या मनगटातील जोर समशेरीच्या तडाख्यांनी सिध्द केलेला आहे; आता आपण आपल्या बुध्दिवैभवाने आजच्या सामाजिक दंगलीत आपली श्रेष्ठ जागा पटकावली पाहीजे ! ‘”
हे उद्गार ऐकुन दोन-तीन तरुण ताडकन उठले व अस्तन्या सारून उद्गारले , ” बाबासाहेब ! आपल्या झेंडयाखाली आम्ही तयार आहोत ! ”
__ रिपब्लिकन पार्टी चे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
( मुंबई – चिराबझार, ४ जून १९२७)
www.republicantimes.in