आम्ही संघटनात्मक लोकशाही टिकवून ठेवण्याचा निर्धार केला आहे का ??


आम्ही संघटनात्मक लोकशाही टिकवून ठेवण्याचा निर्धार केला आहे का ??

” आपण लोकशाहीवरील आपल्या विश्वासाबाबत ठाम तर राहायलाच हवे, पण आपण असाही निर्धार केला पाहिजे की आम्ही जे काही करू त्यातून लोकशाहीच्या शत्रूंना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचे उच्चाटन करण्याच्या कामी आमची मदत मुळीच होता कामा  नये. जर लोकशाही टिकली तर तिची फळे आम्हाला कधी ना कधी चाखायला मिळणारच, पण लोकशाही संपली तर मात्र ते आपले मरणच ठरेल. या संबंधी कोणतीही शंका नको.”
—डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यावरून एक प्रश्न आम्हा समाज बांधवांपुढे जो उभा तो असा की काय बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांच्या उद्धारासाठी दिलेल्या ज्या तीन संघटना आहेत त्यांच्या संविधानाद्वारे संघटनात्मक लोकशाही टिकवून ठेवण्याचा निर्धार केला आहे का ?? कि त्या तिन्ही संघटनेच्या संविधानांना पायदळी तुडविणे सुरु ठेवले आहे??काय त्या तिन्ही संघटनेत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्या संघटनांचे संविधानानुसार रीतसर सदस्य बनून त्या संविधानांच्या अंमलबजावणी विषयी आम्ही गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही? की बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे लोकशाही संपवून आम्ही आमचे मरण ओढवून घेऊ इच्छितो आहे?? कारण सदस्य न होणे म्हणजे संघटनेला संविधानिक लोकशाहीत्मक ठेवणाऱ्या मतदानाच्या अधिकारापासून स्वतःला अलिप्त ठेवून चळवळीचा शहाणपणा सांगण्यात काय अर्थ ??
लोकशाही मूल्ये जगण्यास आम्ही जोपर्यंत शिकणार नाही..संघटनेच्या संविधानानुसार लोकशाही रुजविणार नाही.. संघटनेच्या प्रत्येक निर्णयात स्वतःला सदस्य बनून मतदानाच्या अधिकाराद्वारे आपले कर्तव्य बजाविणार नाही तोपर्यंत आमचे मरण आम्हीच ओढवून घेणार आहोत हे निर्विवाद सत्य आहे…तेव्हा लोकशाहीला प्रत्यक्ष जीवनात जगण्यासाठी बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या संघटनेचे रीतसर सदस्य बनून संविधांनाची अंमलबजावणी करा..संघटनेशी बांधिलकी न स्वीकारता सैरावैरा मोकाट राहण्यात काय अर्थ बरे असू शकतो? संघटनेच्या संविधानाच्या अंमलबजावणीतच आपल्या समाजाचा आणि तात्पर्याने देशाचाही उद्धार समाविलेला आहे.
जय भीम ??

—प्रशिक आनंद—
समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org

(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.