?स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून?
दिनांक २० जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित ऑल इंडिया डिप्रेस क्लासेस वूईमेन्स कॉन्फरन्स मध्ये महिलांना उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
या प्रसंगी तुमच्या परिषदेत बोलतांना मला आनंद होत आहे. दलित वर्गाच्या प्रगतीची व कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या माणसाला हा स्त्रियांचा समुदाय पाहून जेवढा आनंद होईल त्यापेक्षा अधिक आनंद दुसऱ्या कोणत्याही प्रसंगी होणार नाही. तुम्ही इतक्या २० ते २५ हजारांच्या संख्येने इथे उपस्थित राहाल ही गोष्ट दहा वर्षांपूर्वी कल्पना सुध्दा करण्यासारखी नव्हती .
स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय करू शकतात हे मी जाणतो. सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरूनही हे मी सिद्ध करून देईन. दलित वर्गामध्ये काम करण्यास जेव्हा पासून मी सुरवात केली तेव्हा पासून पुरुषांबरोबर स्त्रियाही सहभागी झालेल्या आहेत. म्हणूनच आपल्या परिषदा मिश्र परिषदा आहेत.
स्त्रीयांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजीत असतो. सर्वात अधिक महत्त्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे. मात्र गुलामासारखे वागण्यास खंबीरपने तिने नकार द्यावा व समतेसाठी अग्रह धरावा. या उपदेशाचे तुह्मी पालन केले तर तुह्मा सर्वाना मानसन्मान व कीर्ती प्राप्त होईल एवढेच नव्हे तर दलित वर्गालाही सन्मान व कीर्ती मिळेल अशी मला खात्री आहे.
( संदर्भ vol18/2)
छाया मनवर
समता सैनिक दल, अकोला
www.ssdindia.org
(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बाधणीसाठी कटिबद्ध)