??? समता सैनिक दलाच्या शाखा सर्वत्र स्थापून आपली शक्ती वाढवा?
संकलन: नितीन गायकवाड
माझ्या समता सैनिक दलाच्या शूर सैनिकांनो,
आज या संयुक्त प्रांतात दलाचे दुसरे अधिवेशन भरले आहे. गेल्या १७ वर्षांपासून या दलाचे कार्य मुंबई व मध्यप्रांत येथे मोठ्या जोराने चालले आहे. या दोन्ही प्रांतात काही वर्षांपूर्वी आपल्या किंवा इतर पक्षांची जाहीर सभा काँग्रेसचे गुंड उधळून लावीत असत. १९२७ साली या दलाची स्थापना माझे हस्ते करण्यात आली. त्या दिवसापासून आमच्या सभेत काँग्रेसचा अथवा एखादा मवाली शिरण्याची ताकद नाही. एकदा अॉफिस समोर विरोधी पक्षाची मोठी जाहीर सभा भरली होती. त्या सभेत आपले सैनिक गेले आणि त्यांनी ती सभा व सभेतील दिवाबत्ती, टेबल, खुर्ची वगैरे काबीज करून माझ्या ऑफिसमध्ये आणून टाकली. ते सामान अद्याप माझ्याकडे तसेच आहे. या वस्तू म्हणजे आपल्या या सैनिकांच्या कार्याचे द्योतक आहे.
सांगण्याचा उद्देश एवढाच की आपले सैनिक इतके तडफदार आहेत. ते मनात आणतील तर त्यांच्यावर सोपविलेले कार्य चुटकीसरशी करून दाखवतील इतका मला त्यांच्याविषयी विश्वास वाटत आहे. म्हणून या ध्येयवादी दलाच्या शाखा प्रांतोप्रांती, शहरोशहरी, खेडोपाडी स्थापून शक्ती वाढविली पाहिजे.
समता सैनिक दलाचे संस्थापक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ:-
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंड १८, भाग,२पान नं. ४४२,४४३
समता सैनिक दल
HQ : दिक्षाभूमी, नागपूर
www.ssdindia.org
(संविधानीक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबध्द )