? इतिहास शौर्याचा?
(धर्मांतराच्या अनुषंगाने बृहन्मुंबई येथे घेण्यात आलेल्या त्याकाळातील स.सै. दलाच्या ठरावाची बातमी)?
समता सैनिक दल, बृहन्मुंबई
वरील दलाच्या विद्यमाने सर्व डिव्हिजन मधील ऑफिसर्स व सैनिकांस कळविण्यात येते की, प.पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तारीख २५/५/५६ रोजी नरेपार्क येथील जाहीर सभेत बौद्ध धर्माविषयी अखिल दलित समाजास आदेश दिल्याप्रमाणे येत्या ऑक्टोबर १९५६ मध्ये धर्मांतर करण्याचे निश्चित ठरविले आहे आणि याची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक आंबेडकर अनुयायांने हिंदू धर्माच्या येणाऱ्या सामाजिक व धार्मिक सणांमध्ये (उदा. गोकुळ अष्टमी, गणपती व गणपतीचे, गवरीचे नाच वगैरे आणि यापुढे होणाऱ्या धार्मिक विधीत) भाग घेऊ नये. कळावे ही विनंती.
विशेष सूचना :- दलातील ऑफिसर्स किंवा सैनिक यांच्यापैकी वर नमूद केलेल्या विनंतीप्रमाणे कोणतेही हिंदू धर्मातील धार्मिक कृत्य केल्याचे आढळल्यास त्याच्यावर दलाकडून शिस्तभंगाचा इलाज केल्या जाईल.
एम. एम. ससाळेकर
स.सै. दल, बृहन्मुंबई
संकलन
समता सैनिक दल,
HQ दीक्षाभूमी नागपूर
www.ssdindia.org