? बुद्धजयंती व तिचे राजकीय महत्व ?
A Post By : आयुष्यमती. उज्वला इंगोले.
” ब्राह्मणांनी बुद्धाचे नाव या देशातून धुवून काढण्याचा प्रयत्न करावा हे समजण्यासारखे आहे. तो त्यांचा बोलूनचालून शत्रू होता. त्याची जयंती करावी असा विचार त्यांना कसा रुचेल? परंतु ज्या ब्राह्मणेतरांच्या हितकरिता त्यांना अंधश्रद्धेच्या तावडीतून सोडविण्याकरिता, जंतर मंतरच्या खोट्या धर्माच्या कचाट्यातून मोकळे करून खऱ्या मानवी धर्माच्या मार्गावर आणण्याकरीता, त्यांची माणुसकी प्रस्थापित करण्याकरिता, त्यांचा स्वाभिमानदीप प्रज्वलित ठेवण्याकरिता जो झटला, ज्याने ब्राह्मणेतर जनतेच्या हिताकरिता राजवैभवाचा त्याग केला, ज्याने आपल्या किर्तीने देशाचा लौकिक वाढविला अशा महापुरुषाला ब्राम्हणेतरानी समूळ विसरून जावे, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी तरी बुद्धाची स्मृती जिवंत ठेवणे अवश्य होते.
बुद्ध जयंती साजरी करा असे हिंदुमात्रास सांगावयास आम्हाला हे एकच कारण आहे असे कोणी समजू नये. आमचे मुख्य कारण या पेक्षा भिन्न असून सबळ आहे असे आम्हास वाटते. हिंदूतील सुशिक्षित लोकांना राजकारणात हिंदू संस्कृतीच्या पायावर व हिंदू करिता लोकशाही प्रस्थापित करण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे व त्या प्रित्यर्थ त्याचे प्रयत्न चालू आहे. असल्या हिंदू लोकांच्या बुद्धीची आम्हास किवच येते. या देशात लोकशाही प्रस्थापित करू असे म्हणणारे लोक एक तर मूर्ख तरी असले पाहिजेत किंवा लबाड तरी असले पाहिजेत. परंतु ही लबडी व हा मूर्खपणा फार दिवस चालणार नाही अनुभवाची गाठ पडल्यावर असे दिसून येईल की, ब्राम्हणी धर्म आणि लोकशाही ह्या परस्परविरोधी, एकमेकास विरोधी गोष्टी आहेत. लोकशाही हवी असेल तर चतुर्वर्ण्य नाहीसे झाले पाहिजे. हे चातुर्वर्ण्याचे जंतू काढून टाकण्याकरिता बुद्धाच्या तत्वज्ञानासारखे मारक रसायन नाही असे आम्हास वाटते. म्हणून आम्ही म्हणतो की, राजकारणाची रक्तशुद्धी करण्याकरिता बुद्ध जयंती सर्व हिंदूंनी साजरी करणे हितावह व आवश्यक आहे.”
__ _रिपब्लिकन पार्टी चे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ-भाषणे व लिखाण, खंड २०)
? जयभीम जय बुद्ध ?
—- संग्राहक—–
उज्वला इंगोले
समता सैनिक दल, यवतमाळ
www.ssdindia.org
(रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटीबद्द)