Quote


Short Quotes Collections by Mr. Nitin Gaikwad, Mr. Arian Bouddh


माझ्या नंतर समाजातील काही वर्ग माझ्याशी बेईमानी करेल पण, काही सुशिक्षित तरुणांना माझी चळवळ समजेल, त्याची कुवत असुनही अशिक्षित समाजास दिशा दाखवुन समाज प्रबोधन केले नाही तर,त्यांचे शिक्षण व्यर्थ असेल आणि असा तरुण जर माझ्या समाजात असेल तर माझ्या सारखा दुर्देवी कुणीच नाही.

घटना कितीही चांगली असली पण ती राबविणारे जर अतिशय वाईट असतील तर निश्चितच ती वाईट ठरते.तथापी घटना वाईट जरी असली पण ती राबविणारे जर चांगली माणसे असतील तर ती चांगली ठरते.

जर मला संविधानाचा गैरवापर होतांना आढळला तर ते जाळणारा मी प्रथम व्यक्ती असेन.

कोणत्याही निष्णात पंडिताने बौद्ध धर्माच्या तत्वाविषयी माझ्याशी चर्चा करावी. माझी खात्री आहे की मी त्याचा पराभव केल्यावाचून कधीही राहणार नाही.  (संदर्भ – दि.4 डिसेंबर 1954, रंगून, बर्मा. Vol 18/3)

आपल्या द्ररिद्री व अज्ञानी बांधवांची सेवा करणे, हे सुशिक्षीतांचे पहिले कर्तव्य आहे. बड्या हुद्याच्या जागी गेल्यावर या सुशिक्षीतांना आपल्याच अशिक्षीत बांधवांचा विसर पडतो. याचे कारण त्यांच्यात स्वत:च्या समाजाविषयी आपुलकीची भावना नाही, त्यांच्या ठिकाणी आपल्या बांधवाबद्दल कळकळ व तळमळ नाही, हे होय. जर त्यांनी आपल्या या असंख्य बांधवांकडे योग्य लक्ष दिले नाही तर समाजाचा ऱ्हास होईल.  ( आग्रा दि.18 मार्च 1956)

आपल्या समाजाला सावलीची जागा निर्माण करून दिली आहे. आपली संघटना करून व सतत चळवळ चालू ठेवून या सावलीचा विस्तार करावयास विसरू नका. सावली देणाऱ्या झाडावर कुऱ्हाड चालविणे हे आत्मघातकीपणाचे होणार नाही काय ?