तुमची मुक्ती राजकीय शक्तीत आहे


? तुमची मुक्ती राजकीय शक्तीत आहे. ?

दि. ४ मे, १९३३ रोजी जी. आय. पी. रेल्वे क्वॉर्टर्स, सँडहर्स्ट रोड, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्काराची सभा त्यांच्या चाहत्यांनी आयोजित केली होती. तेव्हा सत्काराला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
” माझ्या कार्याचा आणि गुणांचा आपण खूप गौरव केला आहे. अशी स्तुती करणे म्हणजे तुमच्यासारख्याच एका सर्वसाधारण माणसाचे दैवतीकरण करणे आहे. ही व्यक्तीपूजेची प्रवृत्ती तुम्ही मुळातच काढून टाकली नाही तर ती तुमचा नाश करील. व्यक्ती पूजेमुळे तुम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि मुक्तीसाठी त्या एका व्यक्तीच्या भरवशावर अवलंबून राहता. असे केल्याने तुम्ही तुमचे कर्तव्य विसरता आणि परावलंबी बनता. ही सवय तुम्ही सोडून दिली नाही तर राष्ट्रीय जीवनाच्या प्रवाहात तुम्ही केवळ एक लाकडाचे ओंडके बनून राहाल, तुमची चळवळ संपून जाईल. तुमची मुक्ती राजकीय शक्तीत आहे, तीर्थयात्रा आणि उपवास यामुळे ती मिळणार नाही. भक्ती करण्याने तुमची गुलामी, तुमच्या गरजा आणि तुमची गरीबी हटणार नाही. तुमच्या वाडवडिलांनी पिढ्यानपिढ्या ते करुनही तुमच्या दयनीय अवस्थेत तसूभरही फरक पडला नाही. तुमचे धार्मिक उपास-तापास व कर्मकांड तुम्हाला उपाशी राहण्यापासून वाचवू शकले नाहीत. तुम्ही कायदा बनविण्याची शक्ती तुमच्या हातात घेतली पाहिजे. तेव्हा तुमचे लक्ष तुम्ही उपास-तापास, पूजा व कर्मकांड यातून काढून घेऊन कायदा बनविण्यासाठी सक्षम होण्याकडे वळविले पाहिजे. तो तुमची भूक शमविण्याचा आणि तुमच्या मुक्तीचा उपाय आहे. हे लक्षात ठेवा की, आपण केवळ बहुसंख्य असणे पुरेसे नसून आपण नेहमी दक्ष, सशक्त, सुशिक्षित आणि स्वाभिमानी असले पाहिजे. म्हणजे आपण यशस्वी राहू.”
__ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

? ( RPI-मुक्ती आंदोलनासाठी सज्ज व्हा ! )?

www.republicantimes.in

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.